त्याचबरोबर लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना हा नंबर देण्यात येईल त्यामुळे शेतीची संपूर्ण माहिती संपूर्ण उठाठेव बघता येणार आहे अर्थातच या निर्णयामुळे शेतजमिनी संदर्भात पारदर्शकता निर्माण होऊन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे फसवणुकीला बळी पडता येणार नाही. New Land record Maharashtra शेतकऱ्यांना सुद्धा सतर्क राहता येईल. त्याचबरोबर देण्यात येणाऱ्या हा क्रमांक अकरा अंकाचा असणार आहे.

ULPIN क्रमांकाद्वारे देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करता येईल. जमीन विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती मिळणार आहे. जमिनीचे विभाजन झाल्यास किंवा खरेदी-विक्री झाल्यास नव्या तुकड्याचा क्रमांक वेगळा असणार आहे. या डिजिटल लँड रेकॉर्डमुळे पुढच्या काही दिवसांत फक्त एका क्लीकवर जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि माहिती मिळू शकणार आहे. New Land record Maharashtra