YONO फॉर एव्हरी इंडियन’ ॲप द्वारे बँक ग्राहकांना UPI वैशिष्ट्ये जसे की, स्कॅन आणि पे, कॉन्टॅक्टद्वारे पे, रिक्वेस्ट मनी आणि इतर अनेक सुविधा मिळतील. या वर्षी मे महिन्यात,नवीन SBI खाती उघडण्यात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज वाटपाच्या संख्येत घट झाली आहे. YONO SBI Account Opening

SBI प्रत्येक भारतीयाला अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सोल्यूशन्सद्वारे आर्थिक स्वावलंबन आणि सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांच्या अपेक्षा आणि सुरळीत डिजिटल बँकिंग अनुभव लक्षात घेऊन YONO ॲप अपग्रेड करण्यात आले आहे.

इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधेचा परिचय करून दिल्याने, SBI ग्राहक UPI QR कॅश वैशिष्ट्याचा वापर करून कार्ड न वापरता कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकतात.

6 कोटींहून अधिक YONO वापरकर्ते

2017 मध्ये लॉन्च झाल्यापासून, YONO ॲप देशातील सर्वात विश्वसनीय मोबाइल बँकिंग ॲप बनले आहे. त्याचे 6 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. FY23 मध्ये, YONO ॲप द्वारे 64% किंवा 78.60 लाख बचत खाती उघडण्यात आली आहेत.