अटी काय आहेत?
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी सरकारने एक विशेष योजना आखली आहे. ही योजना पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना लागू होते. कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच या कुटुंबाचे बँक खाते असावे. मुख्य म्हणजे या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त नाही.

तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, मुलीची माहिती, बँक खात्याची माहिती देऊन तुम्ही हा अर्ज करू शकता.