Online Fraud Apps : ऑनलाइन कर्ज घेताना सावधगिरी बाळगा, आणि फसवणूक टाळण्यासाठी या पद्धतींचा वापर करा.

↣ तुम्हाला मिळत असलेल्या फ्री वायफाय पासून लांब रहा.

तुम्हाला एखाद्या ठिकाणी किंवा ऑनलाईन तुमची वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे दाखवावी लागत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नेटवरून हे काम केलेले अधिक उत्तम. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फ्री इंटरनेट किंवा वायफाय पासून हे काम करू नये. यामध्ये धोका होण्याचा चान्स जास्त असतो. Online Fraud Apps

↣ कर्जपुरवठा देणारी संस्था मान्यताप्राप्त आहे की नाही याची चौकशी करा.

आपण एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशन वरून कर्ज घेत असतो त्यावेळेस त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यासंबंधी कंपनीची प्रत्यक्षात माहिती घ्या. म्हणजे सी कंपनी प्रत्यक्षात आहे की नाही किंवा एखादी बनावट व्यक्ती तरी संस्था चालवत नाही ना यासंबंधीची सर्व माहिती घेऊन नंतरच त्या वेबसाईटवर आपली माहिती पुरवा. Online Fraud Apps

↣ मोबाईल ॲप्लिकेशन चे फीडबॅक तपासा.

आपण एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशन मधून कर्ज घेत असाल तर त्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या खाली रिव्ह्यू ऑप्शन मध्ये त्या ॲप्लिकेशन संबंधी फीडबॅक दिलेले असतात. ते एकदा नक्की तपासा त्यानंतरच कर्ज घ्यायचे की नाही याचा विचार करा.

↣ वेबसाईट किंवा ॲप्स वरील नियम आणि अटी समजावून घ्या.

कर्ज घेण्यापूर्वी आपल्या कागदपत्रांची आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेसाठी तसेच छुप्या शुल्कांपासून वाचण्यासाठी वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशनच्या नियमाने अटींना काळजीपूर्वक वाचा. कर्ज देणारी संस्था किंवा ॲप्स मान्यताप्राप्त असेल तर त्याच्या वेबसाईटवर किंवा ॲप्स मध्ये स्पष्टपणे अटी आणि नियम गोपनीयतचे धोरण इत्यादी स्पष्टपणे दिलेले असते.

↣ संपूर्ण खात्री केल्याशिवाय ऑनलाइन कागदपत्रे देऊ नये.

आपले ज्या बँकेत खाते असेल तिथल्या बँकांचा ऑनलाईन एप्लीकेशन खात्री असल्याशिवाय वापरू नये. जसे की तुम्हाला एखाद्या बँकेचे एप्लीकेशन एकसारखे तयार केलेले दिसेल त्यामुळे तुम्ही खात्री केल्याशिवाय कोणतेही प्रक्रिया तेथे करू नये. काही वेळा आपल्या ईमेल आयडी वर किंवा मोबाईल मेसेज द्वारे अनेक प्रकारच्या लिंक पाठवल्या जातात त्यावर क्लिक करू नका. कोणत्याही प्रकारच्या बँकेच्या संबंधित व्यवहारासाठी बँकेच्या वेबसाईटवर जा. तिथे तुम्हाला अधिकृत माहिती मिळेल.Online Fraud Apps