या लोकांना होणार फायदा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे सर्व लोक या योजनेसाठी पात्र असतील जे 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्ज घेतील. व्याजाची सवलत सरकारकडून आधीच लाभार्थ्यांच्या गृहकर्ज खात्यात जमा केली जाईल. ही योजना प्रत्यक्षात आल्यास शहरी भागात राहणार्‍या 25 लाख लोकांना फायदा होऊ शकतो.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते येत्या काळात एक नवीन योजना आणत आहेत, त्याचा फायदा त्या कुटुंबांना होईल, जे शहरांमध्ये राहतात, परंतु जास्त भाड्यामुळे झोपडपट्टी, चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहावे लागते. सध्या बँकांना कोणतीही अतिरिक्त मदत देण्यात आलेली नाही, मात्र यासंदर्भात लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. बँकांनी लाभार्थ्यांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.