सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे 22 ते 25 जून असा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 जून रोजी सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 22 जून रोजी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

23 जून रोजी कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 24 आणि 25 जून रोजी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापुरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचे संकेत आहेत.