कोणाला मिळणार लाभ?

अंगणवाडी मदतनीस जिल्ह्यात अंगणवाडी मदतनिसांची संख्या ३ हजार ४७२ इतकी आहे. त्यांच्यासाठी सुमारे ६९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाने दोन हजार रुपये भाऊबीज स्वरुपात दिले असले तरी इतर मागण्यांचाही विचार राज्य शासनाने करावा, अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून केली जात आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, यात वाढ केलेली नाही. पेन्शन १० हजार रुपये देण्यात यावी, मिनी अंगणवाडी केंद्राचे पूर्ण केंद्रात रूपांतर करण्याचीही मागणी होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम

अंगणवाडी सेविका, मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज स्वरुपात मिळणारी दोन हजार रुपयांची रक्कम थेट खात्यावर मिळणार आहे २ २०२१, २०२२ या दोन वर्षांतदेखील अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांच रक्कम देण्यात आली होती.

मिनी अंगणवाडी सेविका

जिल्ह्यात १३० मिनी अंगणवाडी सेविका आहेत. त्यातील काही जागा रिक्त आहेत.

राज्य शासनाने दोन हजार रुपये अंगणवाडी कर्मचारी, सेविकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आमची मागणी बोनस स्वरुपात हजार रुपये देण्याची आहे. दोन हजार रुपयांची रुपये देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावा. रक्कम कमी आहे.