१) सेंद्रिय खत व्यवसाय-

शेतकऱ्या मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सेंद्रिय खत व्यवसाय हा शेती सोबत करणे योग्य व्यवसाय आहे. आपण पाहतो की ग्रामीण तसेच शहरी भागात सध्या सेंद्रिय शेती आणि त्यापासून उत्पादित केलेल्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. Farming Business In Marathi त्यासाठी आवश्यक असते ते सेंद्रिय खत. या वाढत्या मागणीचा विचार करून जर तुम्ही सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरू करण्यात असाल तर हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

कुक्कुटपालन –

शेतीसोबतच करण्यायोग्य दुसरा व्यवसाय आहे तो म्हणजे कुक्कुटपालन. शेतकरी मित्रांनो,आपण पाहतो की सध्या गावठी कोंबडीचे मांस आणि अंडी हे मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेत. म्हणजेच पोल्ट्री फार्म किंवा चिकन फार्म व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. स्थानिक बाजारपेठेत अंडी आणि कोंबडीला चांगला दर मिळतो आणि त्यांची मागणी वर्षातील ३६५ दिवस राहते. शासनाच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी अनुदान आणि बँकेकडून स्वस्त दरात कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अशा परिस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय नफा मिळवू शकतो

दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन –

दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन हा व्यवसाय देखील शेतीसोबत करणे योग्य व्यवसाय आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. या प्रकारच्या व्यवसायात आपण पाहतो की मोठ मोठ्या कंपन्या देखील आहेत. परंतु सर्वच मोठ्या कंपन्या खेड्यापाड्यापर्यंत ग्रामीण भागात पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा व्यवसाय करून भरपूर नफा मिळू शकतो.