राज्य सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा.! सोयाबीन आणि कापसासाठी शेतकऱ्यांना दिली 4 हजार कोटींची गुंतवणूक

नमस्कार मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. कालपासून देशात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत.

हे सुद्धा वाचा मोदी सरकार देणार या नागरिकांच्या खात्यात 18000 रुपये

राज्यात दरवर्षी कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कधी हवामानाचा तर कधी पिकावर सरकारी धोरणाचा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढ्या कष्टानंतर आणलेली पिके मातीमोल झाली. दरम्यान, या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी 4,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आतापर्यंत शेतकऱ्यांना विविध योजना आणि पीक विम्याच्या माध्यमातून ४५ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Leave a Comment