नियमात बदल काय?

याआधी 1 लाखापर्यंत तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकत होतात. परंतु आता हीच रक्कम 5 लाखांपर्यत गेली आहे. 2020 पासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहतील असा नियम आणला होता. त्यामुळे त्यानुसार आपल्यालाही आपल्या बचत खात्यात 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित ठेवता येतील. बुडणाऱ्या बॅंकेच्या खातेधारकांना तीन महिन्याच्या आधी म्हणजे 90 दिवसांच्या आत आपल्या विम्यासाठी (Cialm) दावा करू शकता.

कसे कराल पैसे सुरक्षित?

DICGC च्या नियमानुसार, जर का तुम्ही ABC नावाच्या बॅंकेत पैसे साठवले असतील तर तुम्ही 90 दिवसांच्या आधी बॅंकेकडे क्लेम करू शकता आणि त्यानुसार आपले 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न काढू शकता तेव्हा तुमचे सुरक्षित असलेले पैसे तुमच्याकडे परत येतील. तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही 5 लाखांच्या वर पैसे ठेवलेत तर तुमचे वरचे पैसे हे सुरक्षित राहणार नाहीत. तुम्ही जर का 8 लाख रूपयांची रक्कम ठेवली असेल तर तुम्हाला परत पैसे हे 5 लाख रूपयांचेच मिळू शकतात.Bank Cash Limit