50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करण्यास सुरुवात इथे तपासा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी आधार प्रमाणीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ खात्यात होणार आता 4500 रुपये जमा

 

जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ प्रशासनाकडून दिला जाणार आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांनासुद्धा बँकेत वारसा नोंद केल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने 2019 मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत हा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. सरकारकडून 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान आधार प्रमाणिकरणासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र यात अद्याप 16 हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झालं नसल्यानं आता या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ सरकारकडून देण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ खात्यात होणार आता 4500 रुपये जमा

 

Leave a Comment