शेतकऱ्यांना साठी मोठी माहिती.! आता शेतकऱ्याकडून कर्जासाठी व्याज घेता येणार नाही, या बँकेने घेतला निर्णय

नमस्कार शेतकऱ्यांकडून कृषी कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांनी तयारी केली आहे. परंतु पीक कर्जाची मूळ रक्कम अशाच शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात यावी जे पीक कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करतात. शिवाय, राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँकांना शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम वसूल करू नये, असा सल्ला दिला आहे.

यंदा राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या नागरिकांचे बँक खाते होणार 31 मार्चपासून बंद चालू करण्यासाठी करा लगेच हे काम

 

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 79 ‘अ’ च्या अधिकारांतर्गत जिल्हा प्राथमिक आणि केंद्रीय कृषी पतसंस्थांना त्रिस्तरीय कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दरवर्षी शेतकऱ्यांनी वेळेवर कृषी कर्जाची परतफेड केल्यास व्याजाची रक्कम कमी करून कर्जाची मूळ रक्कम वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज मिळावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

राज्य सहकारी बँका शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषी कर्ज देतात. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँका सर्वाधिक पीक कर्ज वाटप करतात. मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच मार्चअखेरीस वसुलीचा धोका शेतकऱ्यांवर निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा असंतोष निवडणुकीत उफाळून येऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र अद्यापपर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment