शेतकऱ्यांनो लखपती बनण्याची सुवर्णसंधी अशाप्रकारे करा खरीप हंगामात पिकाची लागवड

नमस्कार मित्रांनो मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झाला असून सध्या तालकोना मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

मात्र, कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच भागात रोवणीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला बीड जिल्ह्याचे कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिला आहे.

75 ते 100 मिमी पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका. जमिनीत ६ इंच ओलावा असेल तेव्हाच पेरणी करावी, असे आवाहनही बाबासाहेब जेजुरकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता घरीच तपासावी, असेही सांगण्यात आले आहे.

रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यासाठी चांगला नाही. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर करण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. सोबतच बाबासाहेब जेजुरकर म्हणाले की, खतांचा बेसल डोस ठरवताना गावातील माती परीक्षण अहवाल किंवा मातीचा सुपीकता निर्देशांक वापरावा आणि पेरणीच्या वेळी द्यावा.त्या चबरोबर शेतकऱ्यांनी रासायनिक खतांपासून दूर राहण्यासाठी बियाण्यांवर सेंद्रिय खतांची प्रक्रिया करावी. ग्राम कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून उगवण व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

Leave a Comment