या सरकारी बँकेने दिले ग्राहकांना भेट; आता मिळणार इतके व्याजदर, इथे बघा किती मिळणार व्याजदर

नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने आता मुदत फेरीवर व्याजदर वाढवलेले आहेत तर ते व्याजदर किती असणार आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा.

FD व्याज दर: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लाखो ग्राहकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सरकारी बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 1.25% पर्यंत वाढ केली आहे. नवीन दर १२ ऑक्टोबरपासून लागू होतील, असे BoM ने सांगितले.

बँकेने सांगितले की, व्याजदरातील वाढ एफडी आणि बँकेच्या विशेष योजनांवर लागू होईल. बँकेने सांगितले की 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर व्याजदर 1.25% ने वाढवला आहे. यामुळे व्यक्ती आणि व्यावसायिक क्षेत्रांना अधिक बचत करण्यास प्रोत्साहन मिळेल

बँक एका वर्षाच्या ठेवीवर 6.50% व्याज देईल. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींसाठी व्याजदर 0.25% ने वाढवून 6.25% करण्यात आला आहे. बँकेने निवेदनात म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.5% अतिरिक्त व्याज मिळेल. त्यांना 200 ते 400 दिवसांसाठी विशेष ठेव योजनेवर 7.% चा आकर्षक व्याजदर दिला जाईल.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment