मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली खुशखबर.! आता या सर्व शेतकऱ्यांना मिळणार मोफत खत

नमस्कार मित्रांनो रासायनिक कीटकनाशके आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीचा पोत बिघडतो. अशा खतांमुळे माती, हवा आणि जल प्रदूषण होण्याची शक्यता असते. ही शक्यता कमी करण्यासाठी सरकारकडून नॅनो खतांचा सल्ला दिला जात आहे.

स्टेट बँके देणार आता महिन्याला तुमच्या खात्यात इतके रुपये, इथे बघा किती मिळणार पैसे

 

रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खतांचा वापर वाढवावा, असे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार नॅनो खताबाबत मोठा निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांना स्वस्त दरात हे खत मिळावे यासाठी केंद्र सरकार 6 जुलै रोजी एक योजना सुरू करणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नॅनो खत खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षासाठी नॅनो खताच्या खरेदीवर अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान ५० टक्क्यांपर्यंत असेल. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एजीआर-2’ असे या योजनेचे नाव असून 6 जुलै रोजी ही योजना सुरू होणार आहे. ही योजना गुजरातमधील गांधीनगर येथून सुरू होणार आहे. गांधीनगरमध्ये 102 व्या सहकार दिनात अमित शहा सहभागी होणार आहेत. हा दिवस सहकारी मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा दुसरा वर्धापन दिन आहे. गांधीनगर कार्यक्रमात अमित शाह शेतकऱ्यांना मदत देणार आहेत.

स्टेट बँके देणार आता महिन्याला तुमच्या खात्यात इतके रुपये, इथे बघा किती मिळणार पैसे

 

Leave a Comment