सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.! सोने झाले वर्षभरात दहा हजार रुपयांनी महाग

नमस्कार मित्रांनो सोन्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुंतवणुकीमुळे त्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने वर्षभरात सोन्याचे भाव तब्बल १० हजार १०० रुपयांनी वाढले आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी भाव कमी झाले, मात्र मार्च २०२४ या महिन्यात सोन्याचे भाव सतत ६२ हजारांच्याच पुढे राहिले आहे. दुसरीकडे चांदीच्याही भावात सतत मोठा चढ-उतार होत आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३ या महिन्यात चांदी ७८ हजार रुपयांवर पोहचली होती. कोरोना संसर्गानंतर सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकांची स्थिती, शेअर बाजारातील पडझड यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून
सोन्याकडे कल वाढत आहे.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

गेल्या वर्षभरातील स्थिती पाहिली तर सोने ५८ हजारांवरून आता ६८ हजारांच्या पुढे गेले आहे. गेल्या वर्षी १७ मार्च २०२३ रोजी सोने ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर होते. तीनच दिवसात २० मार्च २०२३पर्यंत सोन्याने ६० हजारांचा पल्ला ओलांडत ते ६० हजार २०० रुपये प्रति तोळा झाले.
१७ एप्रिल रोजी ६९ हजार, ५ मे रोजी ६२ हजार १०० रुपये अशी उच्चांकी सोने गाठत गेले. मात्र जून ते सप्टेंबर २०२३ या दरम्यान सोन्याचे भाव कमी-जास्त होत राहिले. ऑक्टोबरपासून सोन्यात पुन्हा वाढ सुरु होऊन ते ६० हजारांच्या पुढे गेले. त्यानंतर २९ नोव्हेंबर ६३ तर ४ डिसेंबर रोजी सोन्याने ६४ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर हे भाव काहीसे कमी झाले.
मात्र मार्च २०२४च्या सुरुवातीपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात भाववाढ सुरु झाली व ५ मार्च २०२४ रोजी सोने ६४,६५० रुपये प्रति तोळा झाले. ८ मार्च रोजी ६५ हजार तर ९ मार्च रोजी ६६ हजारांवर सोने पोहचले. १० दिवस चढ-उतार होत राहिला, मात्र २१ मार्च रोजी सोने ६७ हजार ३००, २९ मार्च रोजी ६८ हजार ६०० अशा उच्चांकी भावावर सोन्याने झेप घेतली. त्यात ३१ मार्च रोजी १०० रुपयांनी घट झाली.

Leave a Comment