या जिल्ह्यात पावसाचे मोठे संकट व गारपिटीचा मोठा इशारा, या विभागात पडणार मोठ्याने पाऊस

नमस्कार मित्रांनो गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. आजपासून आणखी तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांत आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर विदर्भातील अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसासाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.

यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज आहे.

मंगळवारी नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बुधवारी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Comment