शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! यंदा राज्यात इतके टक्के जोरदार पाऊस

नमस्कार मित्रांनो राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही भागात उन्हाळा जाणवत आहे, तर काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पावसाची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात १८ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 18 एप्रिलपर्यंत परभणी जिल्ह्यात हवामान खराब राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?

दरम्यान, या दरम्यान 18 एप्रिलपर्यंत राज्यातील अनेक भागात जोरदार वादळी वारे वाहतील, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. यावेळी पाऊस आणि वादळी वारे वाहतील. पंजाबराव डख यांनी या कालावधीत पाऊस मोठ्या प्रमाणावर होणार नसला तरी काही भागात पडणार असल्याचे कळविले आहे. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंजाबराव डख म्हणाले की, काढणी केलेली कांदा, हळद आदी पिके झाकून ठेवावीत.

सर्वाधिक पावसाचा अंदाज
हवामान विभागाने पाऊस मोजण्याचा पाच श्रेणी ठरवल्या असून, त्यानुसार अंदाज वर्तवण्यात येतो. यंदा 106 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, हवामान विभागाच्या श्रेणीनुसार हा सर्वाधिक पाऊस समजला जातो. पहिल्या श्रेणीनुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसर्‍या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसर्‍या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो

Leave a Comment