जिओ धारकांसाठी मोठी बातमी.! आजपासून जिओ कंपनीची रिचार्ज झाले महाग येथे जाणून घ्या किती रुपयांनी वाढले रिचार्ज

नमस्कार मित्रांनो रिलायन्स जिओचे प्लान आजपासून (3 जुलै) महाग होत आहेत आणि आता ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी पूर्वीपेक्षा 12% ते 25% जास्त खर्च करावा लागणार आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात या योजनेचे नवीन दर जाहीर केले होते आणि आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याबाबत ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. प्रत्येकजण त्यांच्या फोनसाठी रिचार्ज केलेल्या प्लॅनच्या नवीन किंमतीबद्दल जाणून घेऊ इच्छितो.

इथे क्लिक करून बघा रिचार्ज किती रुपयांनी वाढणार

जर तुम्ही देखील Jio वापरकर्ते असाल आणि जुन्या प्लॅनच्या किंमतीपेक्षा नवीन प्लानच्या किमतीत किती फरक आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर चला यादी पाहूया…155 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत वाढवल्यानंतर ती 189 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2 GB डेटा देण्यात आला आहे. जिओच्या 209 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत वाढल्यानंतर ती 249 रुपयांची झाली आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो.
239 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत वाढवल्यानंतर ती 299 रुपये झाली आहे. 299 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 349 रुपये करण्यात आली आहे. 349 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत वाढवल्यानंतर ती 399 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर 399 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 449 रुपये करण्यात आली आहे. या सर्व प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.

इथे क्लिक करून बघा रिचार्ज किती रुपयांनी वाढणार

 

Leave a Comment