राज्य शासनाचा मोठा निर्णय.! या महिलांना मिळणार दिवाळीला दोन हजार रुपये; इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही भाऊबीज स्वरुपात दोन हजारांची भाऊबीज दिवाळीला दोन हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना ही रक्कम दिली जाणार आहे.

शून्य ते सहा वयोगटांतील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हीच बाब लक्षात घेऊन शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ वितरित करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना दिवाळीनिमित्त भाऊबीज स्वरुपात दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी शासनाने ३७ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी १ कोटी २० लाखांची रक्कम अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. गेल्या वर्षीदेखील राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज देण्यात आली होती.

अंगणवाडी सेविका

जळगाव जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३५ अंगणवाड्या आहेत. त्यात ३ हजार २६४ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्व सेविकांना दोन हजार रुपये मिळणार आहेत.

👉 इथे क्लिक करून बघा किती तारखेला येणार खात्यावर पैसे 👈

Leave a Comment