शिंदे सरकारने सुरू केली शेतकऱ्यांसाठी नवीन योजना.! शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आता प्रति हेक्टरी इतके रुपये

नमस्कार मित्रांनो  उत्पन्नवाढीकरिता शेतकऱ्यांना बांबू लागवड अनुदान देणार.नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत मुख्यमंत्री शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मोदी सरकारची घोषणा.! या नागरिकांना मिळणार दर महिन्याला मोफत वीज

पुर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा तरतूद होती. या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार आहे. आता २ हेक्टर करिता बाराशे रोप लागवड व देखभालीसाठी प्रति रोप १७५ रुपये अनुदान तीन वर्षांत देण्यात येईल. जुन्या योजनेत एक हेक्टरसाठी सहाशे रोपे देण्याची तरतूद होती. शेतकऱ्याला बांबू रोपांच्या बरोबरच निंदनी, पाणी देणे, संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन, शेतकऱ्याला लाभ होईल.

तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद

Leave a Comment