पेन्शन योजनेबद्दल शासनाने बदलले नियम, आता या पेन्शन धारकांना मिळणार अधिक लाभ

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पेन्शन धारक असाल म्हणजेच, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला पेन्शन मिळत असेल, तर आजची ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे.Old Pension Scheme Update त्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

Sanjay Gandhi Yojana Mandhan Vadh 2023

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या दोन्ही योजनांमध्ये सध्या १ हजार रुपये इतके मासिक अर्थसाहाय्य करण्यात येते. आता यामध्ये वाढ करण्यात आल्या असून ते दीड हजार रुपये इतके करण्यात आले आहे. Old Pension Scheme Update

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत सर्वच लाभार्थ्यांच्या अनुदानात केलेल्या पाचशे रुपये वाढ संदर्भातील अध्यादेश राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता १००० ऐवजी दरमहा १५०० रुपये अनुदान मिळणार आहे.

योजनेंअतर्गत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment