एसबीआय च्या करोडो ग्राहकांना बसणार झटका.! एक एप्रिल पासून या कामासाठी बँक घेणार जास्त पैसे

नमस्कार मित्रांनो अनेक बँका 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू करणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियानेही नियमात बदल केले असून, त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे. एसबीआयने आपल्या विविध डेबिट कार्डांच्या सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यापासून हा नियम लागू होणार आहे.

एसबीआयच्या म्हणण्यानुसार, विविध डेबिट कार्डच्या बाबतीत वार्षिक सेवा शुल्क 75 रुपये करण्यात आले आहे. डेबिट कार्डवरील नवीन शुल्क 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. SBI डेबिट कार्डचा वापर देशातील लाखो लोक करतात. ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीतही SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे.

👉 हे सुद्धा बघा जमीन खरेदी विक्रीच्या कायद्यात झाला मोठा बदल 👈

 

SBI क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डच्या बाबतीत, ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून 200 रुपये अधिक GST भरावा लागेल. सध्या भाडे 125 रुपये अधिक जीएसटी आहे. तसेच, युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्डच्या बाबतीत, 175 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारले जाईल. एसबीआय प्लॅटिनम डेबिट कार्डवर आता 250 रुपयांऐवजी 325 रुपये शुल्क आकारले जाईल. प्राइड वार्षिक देखभाल शुल्क आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड आता 350 रुपयांवरून 425 रुपयांपर्यंत वाढेल. सर्व शुल्कांवर स्वतंत्रपणे जीएसटी लागू आहे.

SBI क्रेडिट कार्डमध्येही काही बदल केले जात आहेत. एसबीआय कार्ड्सने ही माहिती दिली आहे. काही क्रेडिट कार्डांसाठी रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित बदल 1 एप्रिलपासून प्रभावी होतील. या बदलांनुसार, काही क्रेडिट कार्डधारकांना यापुढे क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या फी पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment