राज्यातील सर्व शाळा या तारखेपासून राहणार बंद, इथे बघा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नमस्कार राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 2 मेपासून उन्हाळी सुट्या सुरू होणार आहेत, उर्वरित राज्यातील शाळा 15 जूनपासून तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

संचालक प्राथमिक शिक्षण शरद गोसावी आणि संचालक माध्यमिक शिक्षण संपत सूर्यवंशी यांनी यासंदर्भात संयुक्त परिपत्रक जारी केले आहे. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकसमानता व सातत्य राखण्यासाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षात उन्हाळी सुट्टी सुरू करण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा नियोजित वेळेनुसार कार्यरत असतील किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवले जात असतील, तर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विदर्भ वगळता सर्व राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू व्हाव्यात. जून महिन्यातील विदर्भातील तापमान लक्षात घेता, उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर ३० तारखेला रविवार असल्याने तेथील सरकारी शाळा १ जुलैपासून सुरू व्हाव्यात, असे नमूद केले आहे.

Leave a Comment