या योजना अंतर्गत मिळणार घरकुल साठी 1 लाख वीस हजार रुपये अनुदान; इथे करा ऑनलाइन नोंदणी

नमस्कार… आज आपण महाराष्ट्रातील शबरी घरकुल योजना 2023 शबरी घरकुल योजनेचे नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. दरवर्षी राज्य सरकार आणि केंद्र सरकार ग्रामीण आणि शहरी विकासाच्या दृष्टीने नवनवीन योजना आणते. आणि राज्यात सरकार बदलले की नवीन सरकार त्या योजनांमध्ये काही नवीन बदल करते. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी अनुसूचित जाती जमातीचे असल्यास, कृपया ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना या योजनेचा नक्कीच फायदा होईल.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. आणि GR म्हणजेच या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याबद्दलची सर्व माहिती आणि तत्सम माहिती आणि PDF फाईल्सच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. त्यासाठी ही माहिती पूर्ण वाचा

.शबरी आदिवासी घरकुल योजना, महाराष्ट्र या आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी भागात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी भव्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी घराचे २६९ चौ.फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमलात आणली आहे. ह्या आदिवासी लाभार्थ्यांना “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील केली आहे. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी आदिवासी समुदाय हा पात्र आहे म्हणून त्यांना लाभ दिला जातो. आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करत असताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी दिली जाते

👉 अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थी पात्रतेच्या अटी आणि नियम

  •  या योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीमधील आदिवासी वर्गातील असावा.
  • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ग्रामीण भाग १ लाख, नागरी भाग १.५ लाख आणि महानगर क्षेत्रात २ लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदाराकडे रहाण्यासाठी पक्के घर नसावे.
  •  लाभार्थ्याकडे स्वतःची घर बांधण्यासाठी जमीन असावी किंवा सरकारने दिलेली जमीन असावी.
  • निराधार आणि दुर्गम भागातील आदिवासी, विधवा यांच्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

👉 अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment