एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; पगारामध्ये झाली मोठी वाढ

नमस्कार मित्रांनो एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ते आनंदाची बातमीमध्ये आपण बघणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये मिळणार आहेत आनंदाची बातमी त्यांच्या पगारामध्ये होणार आहे वाढ तर बघूया किती होणार वाढ बघा संपूर्ण माहिती.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीपासून दहा हजाराऐवजी साडेबारा हजार रुपये अग्रीम देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मूळ वेतनाची मर्यादाही २५ हजारांवरून ४३ हजारांपर्यंत करण्यात आली आहे. जो कर्मचारी अग्रीम मिळण्यासाठी अर्ज करेल, त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत अग्रीम देण्याच्या सूचना एसटी महामंडळाचे औद्योगिक विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी राज्यभरातील विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.

महामंडळातर्फे या रकमेवर व्याज आकारले जात नाही. तसेच ही रक्कम दहा हप्त्यांमध्ये वसुल केली जाते. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांमधुन स्वागत होत आहे. राज्यभरात अशा कर्मचाऱ्यांची संख्या ५० हजारापर्यंत असून त्यांना याचा फायदा होणार आहे.

👉 या तारखेपासून होणार पगारामध्ये वाढ येथे क्लिक करून बघा 👈

Leave a Comment